भादा येथे गण स्तरीय प्रशिक्षण संपन्न;पर्यवेक्षिका कटके यांनी केले मार्गदर्शन
बी डी उबाळे
औसा: भादा गण स्तरीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि. 27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 10:00 वा ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे आयोजीत करण्यात आले होते परंतु 11 वाजले पासून हे प्रशिक्षण सुरु करण्यात आले होते. यावेळी भादा,भेटा, कवठा, बोरगाव, काळमाथा आदी गावातील ग्रा पं सदस्य व ग्रामस्तरीय कर्मचारी मु अ, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पशु वैद्यकीय अधिकारी, ऑपरेटर,ग्रामरोजगार सेवक, कृषी सहायक, यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक होते परंतु अनेकांची दांडी या कार्यक्रमास दिसून आली.तर अंगणवाडी सेविका यांची संख्या लक्षणीय होती. या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक या अंगणवाडी पर्यवेक्षीका सुचिता कटके आणि ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले आणि हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपन्न झाला.
0 Comments