मुस्लिम आरक्षनाच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) केंद व राज्य सरकार च्या मुस्लिम आरक्षणा विषयी उदासीन असल्याने झोपलेल्या सरकार विरोधात व राज्यातील हिवाळी अधिवेशनात सरकारने मुस्लिम समाजाचा गंभीर विचार करून मुस्लिम समाजाला न्याय मिळावा व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसिय धरणे आंदोलन समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विचार करून एकमुखाने सहमती देऊन मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज सामाजीक ,राजकीय,आर्थिक शैक्षणिक,औद्योगिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे शासकीय समित्या रंगनाथ कमीशन, सच्चर कमीशन, डॉ. महेमदुर्रहमान कमीशन यांच्या अहवालाने स्पष्ट होत आहे,म्हणुन संपूर्ण राज्यात मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षणाची मागणी समाज करीत आहे, लोकशाही पद्धतीने वेळोवेळी आंदोलन करुण आपली भूमिका या समाजाने शासन दरबारी व्यक्त केलि आहे,मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचे माननिय उच्च न्यायालयाने आदेशित करुण देखील या बाबत शासन गंभीर नाही, म्हणून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुस्लिम आरक्षण मिळच पाहिजे या मागणीसाठी शासनाचे राज्य हिवाळी अधिवेशन सुरु आहे या अनुषंगाने राज्यभरात मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे म्हणुन निलंगा येथे मुस्लिम आरक्षणाच्या मागणी साठी धरणे आंदोलन करण्यात आले याची दखल राज्य शासनाने गंभीरृत्या घ्यावी अन्यथा हे आंदोलन तीवृ करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर मुफ्ती रिजवान, नसीम खतीब,हाफेज महेबूब रशीदी,अब्दुल करीम झारेकर, मुजीब सौदागर,मुस्तफा शेख,सबदर कादरी,शारुख सय्यद,शाफिक सौदागर, तुराब बागवान,उमर फारुख औसेकर,वसीम सय्यद,देवदत्त सूर्यवंशी,इस्माईल खुरेशी,जमीर शेख,मुनिर सौदागर,वाहेद खुरेशी यांसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments