भादा येथे लंगर तोडणी कार्यक्रम,भादेकराच्या जावायाने तोडला लंगर
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी साडेचार वाजता लंगर तोडणे हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे खंडोबा यात्रेनिमित्त लंगर तोडणे कार्यक्रम करण्यात येतो परंतु यावर्षी यात्रेमध्ये लंगर तुटला नव्हता यामुळे हा लंगर तोडणे कार्यक्रम आज ठेवण्यात आला होता हा लंगर तोडण्याचा मान भादा येथील गणपती गायकवाड यांचे जावई शेषेराव वाघे रा.आशिव ता. औसा या जावयांना मिळाल्याने भादेकरांच्या जावयाने हा लंगर तोडला. त्यामुळे उपस्थित भाविक भक्त मोठ्या आनंदाने हा लंगर तोडलेला पाहण्यासाठी आले होते परंतु लंगर कसा तुटला हेच अनेक भाविक भक्तांच्या लक्षात आले नाही, कारण लंगर तोडणी सुरु होणार यासाठी सर्व उत्सुकतेने पाहत असताना ती 20 फुटाच्या जवळपास लोखंडी साखळी लांब करीत असताना ती तुटली आणि तो तोडण्याचा मान गावच्या जावयाला मिळाला आणि जोरदार जमिनीवर प्रहार करण्याच्या उद्देशाने साखळी लांब करीत असतानाच अचानक साखळी तुटली ती उपस्थित अनेकांना समजलीच नाही यामुळे ती साखळी तोडताना पाहण्याची जी उत्सुकता होती ती तशीच राहिली आणि सर्व भाविक भक्त अवाक राहिले. आणि पुन्हा एकच घोषणा झाली येळकोट,येळकोट जय मल्हार म्हणत भाविक घरी परतले.
0 Comments