कराटे स्पर्धेमध्ये योगिता सावंत सुवर्णपदकाची मानकरी
बी डी उबाळे
औसा: येथील कुमारी योगिता नेताजी सावंत या विद्यार्थिनीने IFSKA आमंत्रित खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये काता व कुमिते या दोन खेळ प्रकारांमध्ये सुवर्णपदक व एक रौप्यपदक तर तिचा भाऊ अनुराग नेताजी सावंत यांनी कांस्यपदक मिळवून स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. लातूर येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. सावंत योगिता आणि सावंत अनुराग या बहिण भावांनी उज्वल यश संपादन केल्यामुळे त्यांचे मित्र परवारातुन अभिनंदन होत आहे.
0 Comments