Latest News

6/recent/ticker-posts

भादा पोलिसांची कवठा(ता.) येथे अवैध गावठी दारुवर धाड; लाखाच्या जवळपास किंमतीची दारू नष्ट

भादा पोलिसांची कवठा(ता.) येथे अवैध गावठी  दारुवर धाड; लाखाच्या जवळपास किंमतीची दारू नष्ट



बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा पोलिसांची कवठा तांडा येथे धाड टाकून गुळ मिश्रित रसायन 1 लाखाच्या जवळपास किमतीची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. पोलिसकासून मिळालेली माहिती अशी की, यामध्ये आरोपी रामधन नामदेव जाधव, मुद्देमाल- गुळ मिश्रित रसायन 6 बॅरेल , एकूण 900 लीटर  किं. प्रती लीटर 50 प्रमाणे किंमत रु. 45 हजार रु, आरोपी- विलास भाऊसाहेब चव्हान, मुद्देमाल -.गुळ मिश्रित रसायन 4 बॅरेल , एकूण 600 लीटर  किं. प्रती लीटर 50 प्रमाणे किंमत रु. 30 हजार आरोपी - पप्पू लिंबराज जाधव,मुद्देमाल- गुळ मिश्रित रसायन 3 बॅरेल , एकूण 450 लीटर  किं. प्रती लीटर 50 प्रमाणे किंमत रु.22 हजार 500 वरील प्रमाणे दि. 12 डिसेंम्बर 2021 रोजी भादा पो स्टे हद्दीत सकाळी 8.00 ते दुपार वा पर्यंत  कवठा -तांडा गावात सर्व अवैध दारू विक्री करणारे लोकांचे  घरे चेक केली, तसेच शेता- शेताने जाऊन गावठी दारु भट्ट्या शोधून धाड टाकल्या. सदर ठिकाणी मिळून आलेले गुळ मिश्रित रसायन जागीच नाश करण्यात आले. त्या ठिकाणाहून जवळपास सोळा फायबरचे बॅरेल तसेच दारु बनवण्यासाठी आणलेला कच्चा गुळाचे ढेप देखील मिळून आले आहेत. गून्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या कामगीरीमध्ये पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व  नूतन पोलीस डी वाय एस पी  पवार यांचे मार्गदर्शनाखाली, स पो नि विलास नवले, दिलीपसिंग चव्हान, भिमू देवकर, शिवाजी फड, शिवरुद्र वाडकर, विठ्ठल दिंडे यांनी कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments