Latest News

6/recent/ticker-posts

दंडवाढ रद्द करुन, हेल्मेटसक्ती ऐवजी ऐच्छिक करा, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लातूरकर वाहन चालक, मालक- हेल्मेट सक्ती विरोधी युवक कृती समितीची मागणी

दंडवाढ रद्द करुन, हेल्मेटसक्ती ऐवजी ऐच्छिक करा, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लातूरकर वाहन चालक, मालक- हेल्मेट सक्ती विरोधी युवक कृती समितीची मागणी


लातूर: दि. १२/१२/२०२१ रोजी आम्ही लातूरकर  वाहन चालक,मालक -हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,परिवहन मंत्री ना अनिल परब ,पालकमंत्री ना अमित देशमुख, राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांना दंडाची भरमसाठ वाढ रद्द करुन हेल्मेटसक्ती ऐवजी ऐच्छिक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त नागरिकांना विश्वासात नघेता, कसल्याही प्रकारची जनजागृती नकरता ,१ डिसेबर २०२१ पासुन दंडाची भरमसाठ वाढ व हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी परीवहन विभागाच्या वतिने केली जात असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. वाहन चालवताना नियमाचा भंग केल्यास भरमसाठ वाढीसह,विना हेल्मेट १०००/-दंड, विना हेल्मेट दुचाकी चालकांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द ही केला केला जाणार असल्याचे कळते आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा ही आमची ही प्रामाणिक भूमिका आहे, पण दंडाचीं भरमसाठ वाढ सर्वसामान्यावर अन्यायकारक आहे. नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात चालणाऱ्या वाहनाचा वेग याचाही विचार करणे गरजेचे आहे. राज्यात महामार्ग, आंतराज्य मार्ग महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत रस्त्याची चाळण झालेली आहे, दुचाकींच काय चारचाकी वाहनांनाही वाहन चालवणे अत्यंत जीवावर बेतत आहे असे असताना अचानक हेल्मेटसक्ती करण्यामागे कारण काय ? हेलमेट घालणे ऐच्छिक असावे, हेल्मेटमुळे दुचाकी स्वारांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होते, हे भ्रामक आहे, वाहन संख्या वाढल्यामुळे, तसेच खणलेले, उकरलेले रस्ते, रस्त्यावरील खड्डे ,अशास्त्रीय गतिरोधक, नसलेले पदपथ या कारणामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. हेल्मेटसक्तीमुळे हे अपघात थांबणार नाहीत, त्याचप्रमाणे केवळ हेल्मेट असलेल्या वाहनचालकांचा ही अपघाती मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक शहरातील वाहतुक कोंडीमुळे वाहनांचा सरासरी वेग २० ते ४० किलोमीटर च्या आत असतो त्यामुळे हेल्मेटचा उपयोग होत नाही. समारंभासाठी गेल्यावर, मुलांच्या शाळा, महाविद्यालय, शासकीय, निम्मं शासकीय कार्यालय, सार्वजनिक हॉटेल्स, प्रार्थनास्थळ आदी ठिकाणी गेल्यावर हेल्मेट ठेवायचे कोठे? हेल्मेटचा कायदा कालबाहय झाला आहे, अमेरिकेत ही अनेक राज्यात हेल्मेटसक्ती नाही. कायद्यानुसार आय एस आय मार्क हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे. राज्यात दुचकीचालकाना पुरतील एवढी दर्जेदार हेल्मेट उपलब्ध आहेत? सर्वसामान्याना परवडणाऱ्या नाहीत, १४ वर्षे वयोगटाखालील मुलांना हेल्मेट उपलब्ध नाहीत त्यांना शाळा, क्लासेसला सोडायला जाणाऱ्या पालकांनी प्रत्येकवेळीहेल्मेटचा दंड भरावयाचा का? अनेकांना डोक्यावर हेल्मेटचे ओझे होते, जेष्ठ नागरिक, मानेचा विकार,चष्मा असलेल्यांना हेल्मेट त्रासदायक आहे. हेल्मेटघालून वाहन चालविताना आजूबाजूचे दिसत नाही. मागील हॉर्नचा आवाज येत नाही, अनेकांना त्याच्या डोक्याच्या आकाराची हेल्मेट मिळत नाहीत, दर्जेदार हेल्मेटची अनुपलब्धता, मानेचा विकार, केस गळण्याच्या तक्रारी, रस्त्यावरील त्रासदायक खड्डे यामुळे हेल्मेट सावरताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. मागच्या दिड, दोन वर्षांतील कोरोनाच्या प्रादुर्भावातून नागरीक सावरतेना,सावरते तोच  पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस वाढ, वाढती महागाई आदीने जनता भरडुन गेली आहे. त्यात पुर, पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरिपणाने गेला आहे शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे मोठे व्यापारी आदी आर्थिक विवंचनेत आहेत, अशा परिस्थितीत दंडाच्या रक्कमेत भरमसाठ वाढ किंवा हेल्मेटच्या संदर्भात जनतेमध्ये जनजागृती नकरता.हेल्मेटसक्तीचा  व दंड वाढीचा आदेश लागु करण्यात येऊ नये, आमचा विरोध नियमास, हेल्मेट ला नव्हे तर दंडाचीं भरमसाठ वाढिस व हेल्मेटसक्तीला विरोध आहे, हेल्मेट ऐच्छिक स्वरूपाचे असावे अशी मागणी आम्ही लातूरकर वाहन चालक, मालक-हेल्मेट सक्ती विरोधी कृती संमीतीच्यावतीने अँड प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, दिगंबर काम्बले, श्रीकांत मोमले,जमालोद्दींन मणियार,अँड अभिजीत मगर, महेंद्र गायकवाड, अँड अश्विन जाधव आदींनी केली आहे.

Post a Comment

0 Comments