Latest News

6/recent/ticker-posts

तब्बल दीड महिन्याने औशाहून लातूरला पहिली लाल परी धावली;सर्वसामान्यांची जीवनदायिनी सुसाट

तब्बल दीड महिन्याने औशाहून लातूरला पहिली लाल परी धावली;सर्वसामान्यांची जीवनदायिनी सुसाट


बी डी उबाळे

औसा: गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संपत आता संपत आल्याची चिन्हे दिसत आहे यामुळे दीड महिन्यापासून संपावर असलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी यांनी हळूहळू कामावर येण्यास सुरुवात केल्याचे चित्र आज दिसून आले यामुळे तब्बल 45 दिवसानंतर 1 लालपरी औशाहून लातूरात दाखल विभाग नियंञकासह अधिका-यांच्या निगरानीत पहिली लाल परी औषध घेऊन निघून लातूरला धावली आहे. यामुळे जनसामान्यांची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राची रक्तवाहिनी असा उल्लेख या एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत अनेकांनी केला आहे आणि तो खराही आहे यामुळे ही बस धावली याचा अर्थ महाराष्ट्राची रक्तवाहिनी आणि सर्वसामान्यांची जीवनदायिनी सुरू झाल्याने अनेक समस्या निघणार आहेत यामध्ये प्रथम शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करणार आहे तर आरोग्यासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या गाठी भेटी साठी, कामानिमित्त होणारे प्रवास आता सर्वसामान्य हळूहळू करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments