एच व्ही डी एस योजनेतील रोहित्र बनले शोभेची वस्तु;शिरोळ येथील शेतकऱ्यांची व्यथा
शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला व्यवस्थित वीज पुरवठा व्हावा म्हणून एच वी डी एस योजना प्रभावीपणे राबवली पण या योजनेचा बोजवारा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे उडाला. मौजे शिरोळ वांजरवाडा येथील शेतकऱ्यांनी एच व्ही डी एस योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक डीपी मंजूर करून घेतला प्रशासनाने तो डीपी या योजनेअंतर्गत शेतीमध्ये बसवला सुद्धा पण वर्षभरापासून तो 11 के व्हीचा डी पी फक्त शोभेची वस्तू म्हणूनच आज पर्यंत शिरोळ येथील शेतकरी ज्ञानोबा राम जाधव, रमेश रतन गिरी, बब्रुवान रंगराव जाधव, नरसिंग शिंदाळे यांच्या शेतात फक्त शोभेची वस्तू म्हणूनच उभा आहे. सध्या शेतीला पाण्याची गरज असताना सदर डीपीवर मी जोडणीत नसल्यामुळे शेतकऱ्यांची दैना होत आहे शेतीला वीज मिळावी म्हणून सदर शेतकऱ्यांनी या योजनेतून डीपी बसवला पण डीपीला जोडणीत नाही तर शेतीला पाणी देणार कसं हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. एच वी डीएस योजनेतला हा शेतकऱ्यांचा वैयक्तिक डीपी मागील साधारण एक वर्षापासून फक्त शोभा वाढवण्यासाठी शेतात उभा आहे या डीपी चा उपयोग "असून ओळंबा आणि नसून खोळंबा "असाच झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या लाईनमन, इंजिनियर यांना विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत सदर डीपीची प्रशासनाजवळ नोंदही नाही असे सांगत आहे या शिवारामध्ये एच वी डी एस च्या माध्यमातून 7 डीपी बसवण्यात आले आहेत त्यापैकी फक्त दोन डीपीला जोडणी देण्यात आली आहे आणि बाकीच्या जशास तशा साधारण वर्षभरापासून जोडणीसाठी वाट बघत उभ्या आहेत. या शिवारातील शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव यांनी वेळोवेळी प्रशासनाला सांगूनही वीज जोडणी दिली नाही शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता संपत आला आहे असे ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव नवाज तांबोळी यांनी सांगितले. सदर डीपीची वीज जोडणी लवकरात लवकर न केल्यास वीज वितरण कंपनी अंबुलगा येथे आंदोलन करण्यात येईल आणि उपोषण करण्यात येईल असे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश ज्ञानोबा जाधव यांनी सांगितले आणि सदर डीपी चा काय काळाबाजार झाला याची पण चौकशी झाली पाहिजे असे सुरेश जाधव यांनी सांगितले. सध्या वीज वितरण कंपनीने शेतीतल्या डीपी चे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे काही ठिकाणी थकबाकीदार शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी डीपी कनेक्शन तोडत आहेत पण साधारण वर्षभरापासून डीपीला कनेक्शनच नाही मग वीज जोडणार कि तोडणार हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे हे प्रशासनाने गंभीरतेने याकडे लक्ष देऊन वेळीच वीज जोडणी करून द्यावी अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ग्रामपंचायत सदस्य सुरेश ज्ञानोबा जाधव, नवाज तांबोळी यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे.
0 Comments