स्वारातीम विद्यापिठाच्या उन्हाळी २०२१ परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालयाचे घवघवीत यश
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२१ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र शाखेच्या एमएस्सी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शितल दिलीपराव बोयणे हीने विद्यापिठातून सर्वतृतीय क्रमांक मिळविला आहे. तर कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यापिठातून सर्वद्वितीय व अर्थशास्त्र या विषयात सर्वप्रथम क्रमांक समिना हादिस शेख या विद्यार्थ्यांनीने मिळवला आहे. बिव्होक शाखेतील पदवी परीक्षेत वेब प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात जयराम राजेंद्र पौळ याने प्रथम क्रमांक, वैभव गिरीधर साठे द्वितीय तर माधूरी हरीहरराव जोशी या विद्यार्थ्यांनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर बिव्होक (फुड प्रोसेसींग प्रिजर्वेशन अँड स्टोरेज) या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत रोशनी गुंडेराव कदम ही विद्यापिठातून सर्वप्रथम, फराहानूरसबा खतीब ही सर्वद्वितीय, प्रिया बालाजी वांजरवाडे हीने सर्वतृतीय क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे ब.व्होक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पहिलीच बॅच असून हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकूण २६ विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये नौकरी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्थेचे सचीव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, बि.व्होक. शाखेचे नोडल ऑफिसर डॉ. मिलिंद चौधरी, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शशीकांत देवनाळकर, संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र मदरसे, प्रा. गिरीश पाटील, प्रा. किवडे धनराज, प्रा. मयूर शिंदे, बि.व्होक शाखेचे प्रा. काकडे श्रीनिवास, प्रा. पवार पंकज, प्रा. सोनम पाटील, प्रा. अभिमन्यू गंगाजी, प्रा. राजेश जाधव व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments