आझाद महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
शेख बी जी
औसा: दि.24 येथील आझाद महाविद्यालयात आज दि.24 डिसेंबर वार शुक्रवार रोजी आजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास औश्याचे नगराध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार असणार आहेत. आजी माजी विद्यार्थी मेळाव्यातून नवीन विचार, भविष्यकालीन योजना, नाविन्य संकल्पनांची रुजवन आदि घडून येतात. महाविद्यालयातील व माजी विद्यार्थी यांचा ऋणानुबंध कायम रहावा याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आझाद ॲल्युमिनी असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments