Latest News

6/recent/ticker-posts

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विशेष कोव्हिड लसीकरण शिबिर

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विशेष कोव्हिड लसीकरण शिबिर 


महेताबसाब अजमोदिन पटवारी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आणि राहत मेडिकल फाउंडेशन औसा यांचे कौतुकास्पद कार्य

शेख बी जी

औसा: दि.१८ राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महेताबसाब अजमोद्दीन पटवारी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी व राहत मेडिकल फाउंडेशन औसा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हाश्मी नगर, कुलसुम नगर, बरकत नगर या भागातील नागरिकांसाठी कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन औसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी केले व त्यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपणच आपल्या आरोग्याचे तारणहार आहोत.सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोना सारखे साथीचे आजार टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत.त्यामुळेच हे पाऊल उचलले जात आहे.तसेच लसीकरण शिबिराचा लाभ 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी घ्यावा आणि ज्यांनी अद्याप घेतलेली नाही त्यांना प्रवृत्त करावे.यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी कलशेट्टी मॅडम, एनजीओचे कर्मचारी अतुल सुरवसे, सागर सरवदे यांनीही सहकार्य केले.  या शिबिरात उमर पंजेशा,खाजा शेख,डॉ.जिलानी पटेल,अझरुल्लाह हाश्मी,अक्रम खान,डॉ.रफिक शेख, दस्तगीर शेख,हुसेन पटेल,ऍड. एजाज शेख,ऍड.एफ.एस.पटेल, आसिफ शेख,संपादक मजहर पटेल, पत्रकार आफताब शेख,राहत मेडिकल फाउंडेशनचे सचिव अरबाज शेख,इलियास चौधरी,अमर शेख, उमर शेख,फकीरपाशा शेख, खाजापाशा शेख,रौफ शेख, जहीर पटेल आदींनी शिबिर स्थळाला भेट देऊन लस घेणाऱ्यांना प्रोत्साहन दिले.या शिबिरात सुमारे 50 नागरिकांनी लस घेतली.ज्यामध्ये बहुतांश महिलांचा सहभाग होता.  महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.ऍड.इकबाल शेख यांनी उपस्थित नागरिकांना शासनातर्फे जारी करण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक कल्याण योजनेची  माहिती दिली.शासनाने जारी केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व अल्पसंख्याक समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत.आवश्‍यकतेवर भर देत शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हाजी रसूलसाब शेख, पत्रकार म.मुस्लीम कबीर,ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या प्रा.अंजूम शेख,शिक्षिका आयेशा शेख, सुमैया पटेल,जिनत बागवान, बीबी शेख,समरीन शेख,शहाना शेख,संपादक मजहर पटेल आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments