कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन
निलंगा:( प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी ) बुधवार दि.29 डिसेंम्बर रोजी आझाद आदिवादी कोळी महादेव सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, अन्यथा आगामी काळात आझाद आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे आझाद आदिवासी कोळी महादेव संघटनेचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर भिमलवड यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदनाद्वारे दिले.यावेळी आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष आनंद निळे, कोळी महादेव सामाजिक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख द्रोणाचार्य कोळी, प्रदेश संपर्क प्रमुख गजानन तोटेवाड, शहराध्यक्ष अमोल बोयणे, हणमंत भाऊ बोईनवाड, लक्ष्मण बोयणे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नाही म्हणून कोळी महादेव जातीचे हजारो विद्यार्थी शासनाच्या सुविधेपासून वंचित आहेत. यामुळे कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी लातूर यांना करण्यात आली आहे.
0 Comments