पोलिसांचा प्रमाणिकपणा... रस्त्यात सापडले दागिने मूळ मालकाचा शोध घेऊन केले परत
लातूर: या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, आज रोजी दिनांक 28/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार राजाभाऊ मस्के, माधव बिल्लापटे, नितीन कटारे हे एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत गांधी चौक परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना रस्त्यावर एक बेवारस बॅग पडलेली दिसली. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या- चांदीचे दागिने व काही कागदपत्र दिसून आली. नमूद अंमलदारांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना दिली. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशांन्वये सदरच्या कागदपत्रांवरून बॅगच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा ती बॅग दादोजी कोंडदेव नगर, लातूर येथे राहणारे राजू प्रभाकर वेदपाठक यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांना संपर्क साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले. राजू वेदपाठक यांनी सांगितले की, आज सकाळी काही कामानिमित्त मी गंजगोलाई कडे गेलो होतो. माझ्या मोटार सायकलला लावलेली बॅग त्यामध्ये 04 जोडी सोन्याचे फुले, 06 चांदीचे करंडे, 09 चांदीची कमळे, जोडवे-बीचवे, वाळे आणि सोन्याचा चुरा असा 60 हजार रुपयाच्या चीजवस्तू असलेली बॅग रस्त्यात हरवली होती असे सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे हस्ते सदरची बॅग मूळ मालक राजू वेदपाठक यांना परत देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे प्रमाणिकपणा बद्दल वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
0 Comments