Latest News

6/recent/ticker-posts

अंध रुढी, परंपरांना फाटा देवून दयानंद पाटील यांच्या मुलाचा बसव पद्धतीने आदर्श विवाह

अंध रुढी, परंपरांना फाटा देवून दयानंद पाटील यांच्या मुलाचा बसव पद्धतीने आदर्श विवाह



के वाय पटवेकर

लातूर: शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील यांचें चिरंजीव विक्रम पाटील आणि  चि.सौ.कां. स्वाती गंगणे यांचा अंध रुढी, पंरपरांना फाटा देवून बसव पद्धतीने एक आदर्श विवाह, कल्याण महोत्सव लातूर येथील रुद्रेश्‍वर नगरात पार पडला. या विवाहाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे  वधू-वर यांचा संविधान पद्धतीने शपथविधी शिवाय धर्म ध्वज फडकावण्यात आला. या अनोख्या विवाह सोहळ्याची लातूर जिल्ह्यात चर्चा होत आहे. या विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षता ऐवजी गुलाब पुष्पाचा वर्षाव करण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कल्याण महोत्सव म्हणजेच विवाह करण्यात आला. शरण श्री सदाशिवअप्पां पाटील व शरण श्री योगेश स्वामी यांनी हा आधुनिक बसव पद्धतीच्या विवाह सोहळ्याचे पौराहित्य केले. हे असे लग्न पुराणं काळात आधुनिक पद्धतीने व्हायचे पण काही स्वार्थी धर्म गुरुंनी आपला मार्ग बदलला त्यामुळे नव्याने परत जुन्याच पद्धतीने म्हणजे बसव पध्दतीने कल्याण महोत्सव म्हणजेच लग्न कार्य संपन्न झाले. या उपस्थित जनसमुदायाने सदर लग्नाची वाह वाह केली आणि आम्ही ही असेच बसव पध्दतीने आमच्या मुला, मुलींचे लग्न कार्य लावणार असे म्हणत होते.



Post a Comment

0 Comments