पत्रकार हमीदभाई शेख यांच्या लेखणीतून...
मुस्लिम आरक्षण आणि कथित सेक्युलरिझम
मुस्लिम आरक्षणावरून आज राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली,गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाकडून आरक्षणाची मागणी होते आहे.हबीबूर रहेमान,सच्चर समिती व यांसारखे इतर अनेक समित्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारशी वेळोवेळी केलेल्या आहेत.माननीय न्यायालयाने ही शिक्षणात आरक्षणाची शिफारश केली आहे.तसेच स्वतःला सेक्यूलर म्हणणाऱ्या राजकीय पक्षांकडून त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना आरक्षण देऊचा कॉलम असतोच असतो,जाहिरनाम्यातून तो कॉलम कुठल्या मुहूर्तावर निघेल हे मात्र ठाऊक नाही. 2014 निवडणुकांपूर्वी तात्कालिक सरकारने मराठा आरक्षणासह मुस्लिमांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता.पुढे सत्तांतर झालं आणि पुढचं आपण जाणतोच.2014 ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं आणि तात्कालिक विरोधक असणाऱ्या काँग्रेस -राष्ट्रवादीवाल्यांनी मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजेचा राग आलापायला सुरुवात केली.राज्यभरात आरक्षणासाठी हजारोच्या संख्येने मोर्चे निघाले.त्यात आजचे सत्ताधारी आणि तेंव्हाच विरोधक मुझे आरक्षण चाहिये चा स्लोगन बोर्ड घेऊन त्यात सामील ही झाले.19 ला परत सत्तांतर झालं आणि त्यावेळी मोर्चात सामील असणारे सत्तेत आले.यालाही दोन वर्षाचा काळ उलटून गेला पण मुस्लिम आरक्षणावर चर्चा ना कृती.कोरोनाचं संकट होतं हे मान्य केलं तरी मुस्लिम आरक्षणावर साधी चर्चाही होऊ नये ? त्यात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्राने घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा कोटा वाढवला तरच आरक्षण देणे शक्य असल्याचं विधानसभेत सांगितलं ज्याचे पडसाद आज राज्यभरात दिसले.राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.टेक्निकली नवाब मलिक यांचे म्हणने मान्य करू,मग प्रश्न उरतो की फडणवीसांच्या काळात मिळालेच पाहिजे कसंकाय म्हणत होतात ? बर्ं 14 पूर्वी देशात,राज्यात,अगदी गल्लीबोळातही तुम्हीच होतात मग तेंव्हा का आरक्षणाची मर्यादा वाढवून मुस्लिमांना आरक्षण द्यावं वाटलं ? तेंव्हा तुम्हाला कोणी रोखलं होतं ? बरं शक्य नाही म्हणता आणि दर जाहिरनाम्यात लिहताही ? इतका कुडगेपणा तुमच्याकडे येतोच कसा ? वर्षांनवर्षे पुर्ण होऊ न शकणारी आश्वासने द्यायला मनाची तरी का वाटत नसावी ? का मुस्लिमांना फक्त भाजप संघ-परिवार आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांची भीती दाखवायची परंतू स्वतः मात्र त्यांच्याशी राजकारणा पल्याडली मैत्री जपायची-निभावायची (गेल्या 7 वर्षात राहूल,ममता आणि लालूंव्यतिरिक्त भाजप विरोधात स्पष्ट आणि उघड भुमिका घेणाऱ्या कथित सेक्युलर मंडळींची नावे सांगावित) 4-2 उर्दू नावच्या होयबांना छूटूक मुटूक गुत्तेदारी द्यायची.चार दोन धार्मिक मंडळी सांभाळायची. कार्यकर्त्यांना किंमत नसलेली शोभेची पदं वाटायची.गरज नसलेल्या गोष्टी करायच्या,कुठं शादी खाना बनव.कुठं इफतार पार्टी दे.कुठं मुशायरा ठेव.आणि आपल्या गड्या-माड्या शाबूत ठेवायच्या तुमचा सेक्युलॅरिझम इथपर्यंतचाच का ? समाजही ही असल्या नान इश्यूजना महत्व देतो हे ही दुर्दैवच.आजच्या घडीला मुस्लिम समाजाला आरक्षणाची सर्वाधिक गरज असताना राजकीय पक्षांच्या उदासिनमुळे मुस्लिम आरक्षणाचं घोगडं भिजत पडलय.ज्याचा फटका गरिब मुस्लिमांना बसतोय.आरक्षण हा प्रगतीचा एकमेव आधार नाही पण आरक्षण सामाजिक प्रगतीला आधार देतो ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही.
हमीद शेख,लातुर
0 Comments