Latest News

6/recent/ticker-posts

वर्षभरापासून शोभेची वस्तू म्हणून उभ्या असलेल्या एच डी व्ही एस च्या रोहित्रांना मिळाले वीज कनेक्शन

"इशारा news" च्या बातमीचा दणका...

वर्षभरापासून शोभेची वस्तू म्हणून उभ्या असलेल्या एच डी व्ही एस च्या रोहित्रांना मिळाले वीज कनेक्शन

 


        "इशारा News इम्पॅक्ट"


शिरोळ
:{ प्रतिनिधी/सलिमभाई पठान } मौजे शिरोळ वांजरवाडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात मागील एक वर्षापासून एचडीव्हीएस च्या माध्यमातून मिळालेले रोहित्र हे फक्त शोभेची वस्तू म्हणूनच आज पर्यंत उभे होते पण मराठी अस्मितेचा इशारा या न्यूज पोर्टलने ही बातमी काल प्रखरतेने लावून धरली आणि त्याचाच परिणाम आज वीज वितरण कंपनी अंबुलगा (बु.)येथील वीज कर्मचाऱ्यांनी सदर वर्षभरापासून बंद असलेल्या रोहित्राला आज जोडणी करून शेतकऱ्यांच्या शेतासाठी वीज उपलब्ध करून दिली. "मराठी अस्मितेचा  इशारा"  वृत्तपत्राने बातमी लावून धरल्यामुळे सदर परिणाम दिसून आला म्हणून शिरोळ येथील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव, शेतकरी रमेश गिरी यांनी इशारा पोर्टलचे आभार मानले. "शेतकऱ्यांच्या हितासाठी, इशारा न्यूज सदैव पाठी " हेच या बातमीच्या माध्यमातून दिसून येते. शिरोळच्या ग्रामस्थांनी इशारा न्यूज परिवाराचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments