शंभर टक्के लसीकरण झालेल्या गावांना विकासकामांचे पारितोषिक आ. धिरज देशमुख यांची घोषणा
बी डी उबाळे
औसा: कोरोनाकाळात जनतेचे आरोग्य सुखरूप राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे गावापासून कोरोनाला दूर ठेवणाऱ्या आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणाऱ्या गावांना आधी विकासकामे देऊ, असे आमदार धिरज देशमुख यांनी येथे जाहीर केले. औसा तालुक्यातील अंदोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच, दर्ग्यातील सभागृह कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी धिरज देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आ. धिरज देशमुख म्हणाले, गावात विकासकामे आणायची असतील तर कोरोना गावापासून दूर राहील, याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. कोरोनामुळेच विकासकामांचा बराचसा निधी आरोग्यविषक कामांकडे, सुविधांकडे सरकारला वळवावा लागला होता. त्यामुळे कोरोना आपल्या घरात, गावात पुन्हा वाढणार नाही, यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. ‘हे एकत्रित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण’ अधिकारी, कंत्राटदार आणि जागरूक ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अत्यंत कमी खर्चात अंदोरा येथे ग्रामपंचायतीची देखणी वास्तू उभी राहिली आहे. हे एकत्रित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. बऱ्याचदा शासकीय विकासकामात त्रुटी आढळून येतात. असे इथे झाले नाही. जनतेने असेच विकासकामांबाबत कायम जागरूक रहावे, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण लोखंडे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,ट्वेन्टीवन कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख,औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मांजरा संचालक महेंद्र भादेकर, शेरखान पठाण, मनसेचे तालुकाध्यक्ष,संचालक सचिन पाटील, सचिन दाताळ, विलास पाटील, साबां उपअभियंता जाधव, शाखा अभियंता गारटे, सुुुनील खमितकर, निर्गुण साळुंके, विस्तार अधिकारी पोतदार, अंदोराचे सरपंचल पटेल, उपसरपंच मुळे, गुणवंत कदम, माणिक पाटील, बिरवली सरपंच मानसी कदम, उपसरपंच कदम, पंढरीनाथ गरड, नय्युम पटेल, सालार पटेल आदी उपस्थित होते.
0 Comments