औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
बी डी उबाळे
औसा: तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघा मार्फत होत आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम खरेदी विक्री संघ करीत असून औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले, याप्रसंगी देशमुख यानी संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उटगे, खरेदी-विक्री संघाचे सभापती व शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, उपसभापती चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती जाधव, संचालक सोमवंशी, माडजे, होळकर, गणेश क्षिरसागर सह इतर उपस्थित होते.
0 Comments