Latest News

6/recent/ticker-posts

अमित मेहत्रे यांचा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार; कोरोना काळात शेतक-यांना दिली उभारी, शेतक-यांसाठी केलेल्या कामाची मिळाली पोचपावती

अमित मेहत्रे यांचा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार; कोरोना काळात शेतक-यांना दिली उभारी, शेतक-यांसाठी केलेल्या कामाची मिळाली पोचपावती 


देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) कृषी क्षेत्रात अनेक कर्मचारी विविध शहरात नोकरीस वास्तव्य  करतात. पण आपुलकी जपत शेतक-यांशी नाळ काही अधिका-यांचीच जुळतेे. तेच अधिकारी शेतक-यांना  देखील भावलेले असतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा आधार देत, शेतक-यांना पिकवलेल्या मालाचा मोबदला कसा मिळेल यासाठीची धडपड करणारे  कृषी विस्तार अधिकारी अमित मेहत्रे यांचा शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे राज्यस्तरिय कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यवताळ जिल्ह्यात कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अमित मेहत्रे यांची नाळ तळागाळातल्या शेतक-यांशी जोडली गेली आहे. शेती विषयक मार्गदर्शन त्याचबरोबर शेतक-याच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे कृषी विस्तार अधिकारी अमित मेहत्रे हे राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराचे माणकरी ठरले. गेल्या पाच वर्षाच्या  काळात अनेक शेतक-यांना  शेतात पिकवलेल्या मालाचा योग्य मोबदला मिळावा तसेच शेतकरी जगला पाहिजे. या भूमिकेतून काम केले आहे. शेती विषयक माहिती शेतक-यां पर्यंत पोहचवणे. त्यातून योग्य पिक घेण्यासाठी लगणारी मदत, त्याचबरोबर माल काढणीला आल्यानंतर तो विक्रीसाठीची ग्राहक तयार करण्यास मदत केली आहे. महिला सक्षमीकरण, बचतगट यामाध्यातूनही अनेक कामे केली आहेत. या चांगुलपणाची दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांनी घेतली आणि राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कारातून केलेल्या  चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. यावेळी मनुष्य विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अॅड कृष्णाजी जगदाळे, महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत, पुरस्कार समारंभाध्यक्ष  रमेश आव्हाड, बी. एन.मेहत्रे (सहशिक्षक), सुनंदा मेहत्रे, शितल मेहत्रे यांच्या समवेत पुरस्कारकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments