Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महाविद्यालयात करीअर कट्टा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र महाविद्यालयात करीअर कट्टा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


निलंगा:(  विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील महाराष्ट्र महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणाऱ्या करीअर कट्टा या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे हे उपस्थित होते. याप्रसंगी कोव्हिड-१९ नियमांचे पालन करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, करीअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असून या उपक्रमात विद्यार्थ्यांना करीअरच्या विविध संधी एकत्रीत स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यूपिएससी, एमपीएससी व यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IAS आपल्या भेटीला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून या उपक्रमात आय ए एस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.  याशिवाय भारतीय संविधानाचे पारायण आणि वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उद्योजक आपल्या भेटीला व इ फाईलींग हे उपक्रम तर संगणकशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना सायबर सेक्यूरेटी कोर्स असे कालानुरूप महत्त्वाचे बनत असलेले उपक्रम करीअर कट्टामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम ऑनलाइन स्वरूपात सायंकाळच्या वेळेत होणार असून महाविद्यालयीन शिक्षणात त्याचा अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेता येतो. होतकरू विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपूके हे उपस्थित होते त्यांनीही या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वत:च्या करीअरसाठी त्याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ एस.एस. पाटील, डॉ भास्कर गायकवाड, डॉ मिलिंद चौधरी, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. मयूर शिंदे, प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. सोनम पाटील, प्रा. दत्तात्रय पवार, प्रा. संदिप सुर्यवंशी इत्यादिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करीअर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार IAS आपल्या भेटीला या उपक्रमाचे समन्वयक डॉ भास्कर गायकवाड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुहास माने, उमाजी तोरकड, मनोहर एखंडे, ज्ञानेश्वर खांडेकर, कुंभार सिध्देश्वर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments