Latest News

6/recent/ticker-posts

सय्यद मुनीर अली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; १०१ रक्तदात्यानी केले रक्तदान

सय्यद मुनीर अली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; १०१ रक्तदात्यानी केले रक्तदान


शेख बी जी

औसा: शहरातील कैलासवासी सय्यद मुनीर अली खोजन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिनांक २६ डिसेंबर २०२१ रविवार रोजी आझाद चौक औसा, निलंगा वेस येथे रक्तदान हेच-जीवनदान हे ब्रिद वाक्य घेऊन कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ओमिक्रोन काळात रुग्णांना रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये यासाठी वसीमभैय्या खोजन मित्रमंडळच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.याशिबिराचे उद्घाटन जमियत-उल्मा-ए-हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना मोहंम्मद अमजदसाब सिद्दीकी व मौलाना मोहंम्मद इस्राईल रशीदी जमियत- उल्मा- ए-हिंद लातुर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरामध्ये निखिल पिंगळे पोलिस अधिकारी लातूर,मधुकर पवार उपविभागीय पोलिस अधिकारी औसा,भरत सुर्यवंशी तहसीलदार औसा, शिवशंकर पटवारी पोलिस निरीक्षक औसा, मराठा समाज महंत औसाचे राजेंद्र गिरी महाराज, सदानंद गिरी महाराज, प्रदीप मोरे,जमियत-उल्मा-ए-हिंद चे शहाराध्यक्ष मौलाना इरफान सोदागर, सदर मजलिस उल्मा औसाचे सय्यद कलीमुल्लाह, डॉक्टर आर आर शेख औसा तालुका आरोग्य अधिकार, निशांत राचट्टे, महेबुब गल्लेकाटू, सय्यद मुजफ्फर अली इनामदार,वसीम सिद्दीकी, स्वच्छता निरीक्षक महेमूद शेख, संपादक मजहर पटेल, मुख्तार मणियार, पत्रकार इलियास चौधरी, आसेफ पटेल, आफताब शेख,शफीयोद्दीन नांदुरगे, अॅडव्होकेट शाहनवाज पटेल, मनियार एफ एच, शेख चांद, चाॅदभाई वाळूवाले ,अब्दुल गनी करपुडे, डॉक्टर सुलतानी, सुलतान शेख या मान्यवरांचा वसीमभैया मित्रमंडळच्या वतीने सत्कार करण्यात आले.या शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संजीवनी ब्लॅड बॅंक लातुरचे संचालक बालाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी रोहीणी कातळे, मेघा येडके, तंत्रज्ञ मंदाकिनी महापुरे, मनिषा विभुते, लक्ष्मी आडसुडे, श्रीदेवी कांबळे व त्यांचे सहकारी व अन्य तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या शिबिराप्रसंगी वसीम भैया मित्र मंडळचे जमीर अली खोजन, ईनायत अली खोजन, बाबुअली खोजन, अकबर भैय्या खोजन, शाकीर अली खोजन आदिनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments