Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहरातील जुन्या रेल्वेस्थानकावर डोक्यात दगड घालून एकाचा खून

लातूर शहरातील जुन्या रेल्वेस्थानकावर डोक्यात दगड घालून एकाचा खून 


के वाय पटवेकर

लातूर: शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या जुन्या रेल्वे स्थानकात एका अज्ञात इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आज २१ डिसेंबर रोजी सकाळी घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच डिवायएसपी जितेंद्र जगदाळे, गांधी चौक पोलिस निरिक्षक माकोडे व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोहेकॉ वैजनाथ माने हे रेल्वे आरक्षण करण्यासाठी जून्या रेल्वे स्टेशन शेजारील आरक्षण केंद्रात सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान गेले होते, तिथे त्यांना शेजारील जून्या पडक्या रेल्वे स्थानकात खून झाल्याची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी गांधी चौक पोलिसांना कळवले. ज्या इसमाचा खून झाला त्याचे वय अंदाजे ४५ वर्षाचे आहे. तसेच तो बांधकाम मजूर असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या खून झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. ज्याचा खून झाला आहे, त्याचा वर्ण काळा असून सडपातळ बांधा आहे. अंगावर पांढर्‍या रंगाचे शर्ट व राखूंडी रंगाची पँन्ट आहे. सिमेंट पँटला आणि बुटाला लागलेली आहे. तसेच त्याच्या मृतदेहाशेजारी एक डायरी सापडली असून या डायरीत निलंगा तालुक्यातील प्रामुख्याने निटूर सर्कलमधील फोन नंबर असल्याचे दिसून येत आहे. गांधी चौक पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments