भादा येथे जनसेवा फाउंडेशन पुणे कडून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन
औसा: तालुक्यातील भादा येथे सोमवार दि 20 डिसेंम्बर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य असलेले अमोल कांबळे यांनी प्रास्ताविक माहिती दिली, यामध्ये गेल्या काही दशकांमध्ये भारतातील लोकसंख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे, सध्या देशामध्ये सुमारे 13 कोटी लोकसंख्या हि 60 वर्षापेक्षा जास्त वयाची आहेत, हे देशातील एकूण लोकसंख्येपैकी नऊ टक्के आहे. विविध संशोधनानुसार ही संख्या 2050 पर्यंत साधारण 32 कोटी च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांना अडचणींमध्ये वाढ होत आहे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या गरजा भागविण्यासाठी सेवांचे नवीन मॉडेल विकसित करणे हे ही आवश्यक आहे. याच करिता सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सर्व राज्यात सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त साठीची ही रस्ते हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन तर्फे चालविली जाईल असेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे विभागीय अध्यक्ष तथा सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी भास्कर पाटील, सदस्य अमोल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित पुण्य करता ग्रामपंचायत कडून सदस्य सूर्यकांत उबाळे, ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, शिवाजी बनसोडे, नंदू फरताळे यांनी सहकार्य केले आणि हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
0 Comments