Latest News

6/recent/ticker-posts

धार्मिक वादविवाद टाळून सुसंवादी समाज निर्माण करणे काळाची गरज- डॉ. फारुख तांबोळी

धार्मिक वादविवाद टाळून सुसंवादी समाज निर्माण करणे काळाची गरज- डॉ. फारुख तांबोळी


दयानंद वाणिज्यमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

लातूर:{प्रतिनिधी/हबीब मणियार} सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी व तो वाढवण्यासाठी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून सामाजिक समतेच्या चळवळीला पाठिंबा दिला गेला पाहिजे. तसेच धार्मिक वादविवाद टाळून सुसंवादी समाज निर्माण करणे काळाची गरज आहे .त्याकरिता तशी कटिबद्धता तयार करावी लागेल असे प्रतिपादन प्रा.डॉ. फारुख तांबोळी यांनी केले. लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने 18 डिसेंबर हा दिवस " अल्पसंख्यांक हक्क दिवस" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतांना चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, शालेय व उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित न ठेवता त्याला त्यांच्या संस्कृती आणि परंपरा समजून घेणारा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, इनोव्हेशन आणि इंक्युबेशन सेंटरच्या प्रभारी डॉ.मनीषा आष्टेकर, ग्रंथपाल प्रा.विठ्ठल जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे,आयक्यूएसी समन्वयक डॉ.बालाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून चर्चासत्राची सुरुवात करण्यात आली. सदरील चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ.मनीषा आष्टेकर यांनी केले. अल्पसंख्यांक समुदायाला त्यांचे हक्क व कर्तव्य यांची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निर्माण केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रावण बनसोडे यांनी केले तर शेवटी आभार प्रा.विठ्ठल जाधव यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विशाल वर्मा, प्रा.आकांक्षा भांजी यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments