गोसावी समाजबांधवांच्या वतीने दफनभूमी ची मागणी
निलंगा:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) मागील अनेक वर्षांपासून गोसावी समाजसाठी कोठेही दफनभूमी नसल्या कारणाने व तालुक्यातील प्रत्येक गावात गोसावी समाजाचे घर असून अलीकडील कालावधीत निलंगा शहरातील घरांची वाढती संख्या पाहता प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे दफनभूमी. परिस्थिती पाहता भूमिहीन असणारे, स्थलांतरित झालेले समाजबांधव आज अक्षरशः अंतविधी घरामध्ये उपलब्ध असलेल्या जागेत करीत आहेत ही भयावह परिस्थिती अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे व दिवसेंदिवस वाढत आहे हे पाहता तात्काळ दफणभूमीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी निलंगा उपजिल्हाधिकारी (मा. शोभा जाधव ) निलंगा तहसीलदार व न. पा. मुख्याधिकारी निवेदनाद्वारे करण्यात आली. येणाऱ्या काळात सर्व राजकीय प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून मागणी मंजूर करून घेण्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रसंगी गोसावी समाजाच्या वतीने प्रवीण अनंत गिरी , दिनकर बन , माधव गिरी दिगंबर गिरी, जयराम गिरी , प्रमोद पुरी ,ओमगिर गिरी (सरपंच), निरंजन गिरी ,नारायण भारती , नितीन गोसावी , सुंदरगिर गिरी , शंकर गिरी ,कैलास गिरी , दत्तात्रय गिरी , भगवान गिरी , माधव गिरी (नणंद) अमर गिरी , संदीप गिरी , शुभम गिरी , वैभव गिरी , ईश्वर बन आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.
0 Comments