Latest News

6/recent/ticker-posts

गावामध्ये तंटे होऊ नये म्हणून भादा पोलिसांकडून समन्वय बैठक

गावामध्ये तंटे होऊ नये म्हणून भादा पोलिसांकडून  समन्वय बैठक 


दोन्ही बाजूंनी मते जाणून घेऊन लवकरच मार्ग निघेल अशी माहिती भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.



बी डी उबाळे

औसा: तालुक्यामध्ये कोणत्याही गावांमध्ये विनाकारण तंटे होऊ नये याकरिता भादा पोलिसाकडून समन्वय बैठक घेऊन नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न गुरुवार दि. 30 डिसेंबर 2021 रोजी पोलिसांनी केला. भादा ता. औसा येथे सध्या आसलेल्या स्मशान भूमीतून रस्ता काढण्यासाठी कागदपत्र घेऊन एक गट सक्रिय झाला असून तो गट उसाच्या गाड्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतातील ऊस कारखाना किंवा इतर ठिकाणी हलविता येत नाही यामुळे बौद्ध स्मशानभूमी जी गेल्या तीन-चार पिढ्याने ती जागा बौद्धच्या ताब्यात आहे. परंतु एका दप्तरप्रिय नागरिकाने जुन्या नोंदीची कागदपत्र काढून ती स्मशानभूमीच नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतकडे कागदपत्र सादर करून केला आहे तर त्या ठिकानाहून रस्ता दिला तर ती उर्वरित सर्व जागा बौद्ध समाजाच्या नांवे करून देण्याची तयारी ग्राम पंचायत कडून सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्त समिती अध्यक्ष संबंधित शेतकरी यांनी त्या रस्त्याच्या मोबदल्यामध्ये देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजले आहे. यामुळे गावामध्ये तंटे होऊ नये म्हणून दोन्ही बाजूचे मत घेऊन पोलीस समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहेत या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, बिट अंमलदार डोलारे आदी कर्मचारी बौद्ध समाजाच्या बैठकीमध्ये जाऊन चर्चा केली आणि मार्ग काढण्याच्या प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments