Latest News

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिरोळ वांजरवाडा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची प्रभात फेरी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिरोळ वांजरवाडा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची प्रभात फेरी

 


शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) जिल्हा परिषद,लातूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मौजे शिरोळ वांजरवाडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यातर्फे प्रभात फेरीचे आयोजन आज दिनांक 15 डिसेंबर रोजी करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी,मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी ही प्रभात फेरी यशस्वीरित्या आयोजित केली. प्रभात फेरी मध्ये मुख्यतः संपूर्ण गाव लसीकरण करण्यावर भर दिला. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा, अशा अनेक उद्बोधक घोषणा देण्यात आल्या गल्लोगल्लीत प्रभात फेरी ने प्रत्येक कुटुंबासमोर, प्रत्येक घरासमोर घोषणा देऊन प्रबोधन केले गावकऱ्यांनी पण उस्फूर्तपणे या छोट्या विद्यार्थ्यांच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे ठरवले. प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बिरादार, गायकवाड, म्हेत्रे, डोहळे, देवापुरे रामकिशन यांनी प्रयत्न केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, सौदागर पुंडे, अरविंद कदम, ग्रामपंचायत सदस्य नवाज तांबोळी यांचेही सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments