भादा पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्राची ग्रा प ने केली मागणी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा हे सुमारे आठ हजार लोकवस्तीचे गाव असून या गावासाठी पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा अभावी विस्कळीत होत आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर गावपुढार्यांना नागरिक शिव्यांची लाखोळी वाहत आहेत. यामुळे भादा येथील पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र मंजूर करून तात्काळ बसविण्यात येऊन कार्यान्वित करावे अशी मागणी उपमुख्यकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी औसा यांच्याकडे सरपंच सौ मीनाबाई दरेकर यांच्या स्वाक्षरीने पत्र घेऊन उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, सूर्यकांत उबाळे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, यांनी मागणीचे निवेदन सादर केले आहे. तसेच या मागणीसाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ठरावाची प्रत ही निवेदनासोबत जोडली आहे. त्यामुळे भादा ग्रामस्थांच्या सुरळीत पाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ नवीन विद्युत रोहित्र बसवावे अशी मागणी होत आहे.
0 Comments