वडगाव (काटी)च्या समृध्दी जयदेव म्हमाणे यास पुण्यात ब्लॅक बेल्ट प्रधान
पुणे: तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील रहिवासी परंतु सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले जागतिक किकबॉक्सिंगपटू जयदेव घनश्याम म्हमाणे यांची कन्या कु. समृद्धी जयदेव म्हमाणे याने पुणे येथे ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली. समृध्दी ही गेले साहा ते आठ वर्षापसून कराटे चे प्रशिक्षण घेत या परिक्षेत यश मिळविले. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कासारसाई (ता. मुळशी) येथे किंग मर्शल आर्टस् या संस्थेच्या वतीने या परिक्षाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यीना स्वसंरक्षणाचे महत्व पटावे आणि त्यांना आत्मनिर्भर होता यावे या उद्देशाने एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीरात जवळपास 100 हुन अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये समृद्धी म्हमाणे हिने कराटेमधील ब्लॅक बेल्ट मास्टर पदवी मिळवली. या प्रशिक्षण शिबीरात स्वसंरक्षण मार्शल आर्ट्स तसेच योगा शिबीरही संपन्न झाले. स्वसंरक्षासाठी कराटे आवश्यक असून कासारसाई परिसरातील महिला व मुलींनी या प्रशिक्षण शिबीराच्या संधीचा लाभ घेतला. या प्रशिक्षण शिबीरात जयदेव म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थीना स्वसंरक्षाचे व आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच त्यांचे शरीर निरोगी राहवे यासाठी रेसलिंग, कराटे, किकबॉक्सिंग या खेळाचे नियमित वर्ग सुरु करण्याचे नियोजन असल्याचे मत किंग मार्शल आर्ट्स संस्थेचे अध्यक्ष तथा जागतिक किकबॉक्सिंगपटू जयदेव म्हमाणे यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे उद्योजक अविनाश रानवडे म्हणाले की, आरोग्यविषयक आपला दर्जा उंचावण्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे सांगून नियमित व्यायाम केल्यास शरीर निरोगी, दिर्घकालीन, सुदृढ आयुष्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीर उत्साही बनते, संकटावर मात करण्यासाठी प्रेरणा मिळते व शरीराची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. सध्या परिसरातील मुलांमुलींचे व्यायाम बंद असल्याने त्यांच्या स्वसंरक्षणासाठी व आत्मनिर्भर होण्यासाठी किंग मार्शल आर्ट्सच्या माध्यमातून किंकबॉक्सिंगपटूजयदेव म्हमाणे यांनी घेतलेले प्रशिक्षण शिबीर प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सेवा निवृत पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, जयदेव म्हमाणे, मयूरी शेळकंदे,मुग्धा वांजळे,साक्षी जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments