प्रभात क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश
लातूर: हैदराबाद येथे झालेल्या 35 व्या राष्ट्रीय शोतोकान कराटे चॅम्पियनशिप 2021 आयोजक जपान कराटे असोसिएशन स्पर्धेत सहभाग नोंदवून लातूरच्या खेळाडूंनी यश संपादन केले स्पर्धेत विविध वजन गटात प्रभात क्रीडा मंडळ च्या विद्यार्थ्यांनी काता व कुमीते या प्रकारात 26 पदकाची कमाई केली आहे. स्पर्धेत सुवर्णपदक विजेते अथर्व गायकवाड (दुहेरी सुवर्णपदक) सोनाली टेंकाळे, आयुषा होणाळीकर, नम्रता कांबळे, गौरवी चव्हाण रजत पदक विजेते वैष्णवी नागरसोगे, आयुषा होणाळीकर, हर्ष शिंदे, समृद्धी चापुले, श्रद्धा रसाळ ,गौरवी चव्हाण ,नम्रता कांबळे ,श्रावणी देवाप्पा ,सोनाली टेंकाळे, कास्यपदक वैष्णवी नागरसोगे , हर्ष शिंदे, गजेंद्र होणाळीकर (दुहेरी कांस्य), समृद्धी चापुले, श्रद्धा रसाळ, श्रावणी देवाप्पा, तन्वी देवाप्पा(दुहेरी कांस्य), साक्षी सोळंके ,यांनी पदक मिळविले या सर्व विद्यार्थ्यांना सुरेखा गिरी (प्रभात क्रीडा मंडळ) सचिव तथा राज्य युवा पुरस्करार्थी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments