मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या;औशात साखळी धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस
बी डी उबाळे
औसा: मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक 22 डिसेंबर 2021 बुधवार रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. यावेळी या साखळी धरणे आंदोलनाचे सविस्तर वृत्त असे शासनाने वेळोवेळी अनेक आयोग व समित्या बनवून महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या परिस्थिती बाबत आढावा घेतला व प्रत्येक आयोग व समित्यांना या समाजाला उन्नती व प्रगती करण्यासाठी शैक्षणिक आर्थिक व सामाजिक स्तरावर आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात जोडणे अनिवार्य असले बाबत शिफारस केलेली आहे. परंतु या राज्यातील अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत यापूर्वीच्या सरकारांनी उदासीनता दाखवली ज्यामुळे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणांस नम्रपणे निवेदन की, आपण सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नात्याने दिनांक 22 डिसेंबर 2021आज पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण बाबत ठोस निर्णय घेऊन अध्यादेश पारित करावा. जेणेकरून या समुदायास देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देण्याची संधी प्राप्त होईल तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही औसा शहरातील मुस्लिम समुदाय दिनांक 22 डिसेंबर 2021बुधवार पासुन ते 24 डिसेंबर पर्यंत असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत औसा तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या साखळी धरणे आंदोलनात विधिज्ञ मंडळ औसा,आम आदमी पार्टी औसा,मराठा क्रांती ठोक मोर्चा,जन एकता संघटना, वंचित बहुजन आघाडी,मुस्लिम विकास परिषद अशा विविध संघटनांनी या आरक्षणासाठी समर्थन दिले. या आंदोलनात आम्ही औसेकर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सोशल डिस्टन्स व कोरोनाचे नियम पाळून साखळी आंदोलन करीत औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
0 Comments