जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे 25 आणि 26 डिसेंबर रोजी चार प्रयोग
लातूर:(प्रतिनिधी)जिल्हा परिषद जिंदाबाद या जिल्हा परिषदेच्या कारकीर्दीवर आधारित दोन अंकी नाटकाचे 25 डिसेंबर रोजी दोन आणि 26 डिसेंबर रोजी 2 असे चार प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. स्व. दगडोजिराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड लातूर या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी आणि 26 डिसेंबर रोजी दुपारी 3:00 वाजता आणि सायंकाळी 6:00 वाजता या दोन अंकी नाटकाचे प्रयोग सादर होणार असून समाजातील गरजूना मदत करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने तिकीट लावून हे प्रयोग ठेवले आहेत. जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आलेलं होतं, दरम्यान या नाटकांमध्ये जिल्हा परिषदे चे समाजाशी असणारे नाते जिल्हा परिषदेचे कामकाज, समाजकारण, ग्रामीण राजकारण, यासोबतच जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामाच्या योजनांची माहिती प्रबोधनात्मक रित्या देण्यात आलेली आहे. शिवाय लोकसंगीताचा ही या नाटकांमध्ये सुयोग्य वापर करण्यात आलेला आहे. पञकार दिपरत्न निलंगेकर यांची कथा आणि दिग्दर्शन असणाऱ्या या नाटकाला 2019 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. हाच धागा पकडून जिल्हा परिषदेच्या वतीने समाजातील गरजूना मदत करण्यासाठी पुन्हा या प्रयोगाचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली आणि या प्रयोगाचं आयोजन करण्यात आला आहे. जिल्हा परिषद लातूरची निर्मिती असणारे हे नाटक सर्वांसाठीच मनोरंजन करणारे ठरणार आहे. दिनांक 25 डिसेंबर रोजी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना पाचारण करण्यात आले आहे. या चारही शोला जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेवरती प्रेम करणाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
0 Comments