Latest News

6/recent/ticker-posts

निटुर गावामध्ये घरो-घरी जाऊन उर्वरित लाभार्थ्यांचे कोवीड-19 चे लसीकरण

निटुर गावामध्ये घरो-घरी जाऊन उर्वरित लाभार्थ्यांचे कोवीड-19 चे लसीकरण


सागर तापडिया

निटूर
: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर यांच्यामार्फत  हर घर दस्तक अभियांन राबविले जात आहे. यामधे  प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर यांच्या वतीने प्रामुख्याने ANM व आशा कार्यकर्ती या प्रत्येक नागरिकांच्या घरी भेटी देत आहेत. भेटीतून कुटुंबातील लसीकरण झाले किंवा नाही याबद्दल माहिती घेत आहेत. लसीकरणाबद्दल जनजागृती करून, पात्र लाभार्थी जे की अजून सुद्धा लसीपासून वंचित आहेत त्यांना त्यांच्या घरीच कोविड-19 चे लसीकरण करण्यात येत आहे. यावेळी उपस्थित ANM श्रीमती पिटले, व्ही टी मॅडम, आशा कार्यकर्ती कवडे एल एस, निर्मला ताई मिटकरी, लक्ष्मीताई पारधे, वर्षाताई सावळसुरे, सरस्वती सावळे इत्यादी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे मोहिमेत गावातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व गावाचे शंभर टक्के लसीकरण साध्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments