Latest News

6/recent/ticker-posts

लातुरात 17 वी राज्यस्तरीय थाई-बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

लातुरात 17 वी राज्यस्तरीय थाई-बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात


के वाय पटवेकर

लातूर: क्रीडा संकुल लातूर येथे गेल्या दोन दिवसापासून सतराव्या महाराष्ट्र थाई-बॉक्सिंग राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेकरिता महाराष्ट्र भरातून एकूण 436 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. राज्यभरातून 14 जिल्ह्यांनी आपला सहभाग नोंदविला असून आयोजकांनकडून या स्पर्धेचे अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा अत्यंत उत्साहात सुरू आहेत पुढे महाबळेश्वर येथे होणाऱ्या 17 व्या थाई-बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेकरिता यशस्वी विद्यार्थ्यांचे निवड होणार असल्याचे महाराष्ट्र थाई-बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष पी.वाय. आत्तार यांनी इशारा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. स्पर्धा यशस्वी करिता लातूर जिल्हा थाई-बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव फरान नबीजी व टीम परिश्रम घेत आहे.

Post a Comment

0 Comments