Latest News

6/recent/ticker-posts

रोटरी क्लब परिवार लातूर च्या वतीने पत्रकारांसाठी सर्वकष आरोग्य तपासणी शिबिर

रोटरी क्लब परिवार लातूर च्या वतीने पत्रकारांसाठी सर्वकष आरोग्य तपासणी शिबिर 


लातूर:(प्रतिनिधी) पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ,"दर्पण दिनानिमित्त " सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्वंकष मोफत आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

रविवार 10 /01/2021 (वेळ:- सकाळी 10 ते दुपारी  2 वाजेपर्यंत)

शिबिरामध्ये होणाऱ्या तपासण्या

1)वजन

2)उंची

3)बीएमआय

4)इसिजी

5)ब्लड प्रेशर

6)ब्लड शुगर फास्टिंग(मधुमेहासाठी तपासणी),

7)लिपिड प्रोफाइल:-(रक्तातील चरबीची तपासणी)

      A)ट्रायग्लिसराईड,

      B) टोटल कोलेस्टेरॉल,

      C)HDL, 

      D)LDL, 

      E)VLDL.

8)Sr Creatinine,(किडणीची तपासणी),

9)डोळ्यांची संपूर्ण तपासणी ,

10)फिजिशियन मार्फत सर्वंकष तपासणी.

शिबारासाठी महत्वाच्या सूचना:-

1)शिबिरासाठी 05 व 06 जाने. 2021 रोजी पूर्व नोंदणी आवश्यक आहे .

2)कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या शिबिरा दिवशी गर्दी टाळण्याकरिता व सर्वांच्या संपूर्ण तपासण्या व्यवस्थित होण्या करीता सकाळी 10 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत टप्याटप्याने सर्वांना वेळ देण्यात येईल.

3)दिनांक 09जानेवारी 2021 ते 10 जानेवारी 2021 या सात दिवसात सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये डॉ. विश्वास कुळकर्णी यांचे ममता हॉस्पिटल येथे येऊन सर्वांनी नोंदणी करून ईसीजी, रक्ताच्या सर्व प्रकाच्या तपासण्या उपाशी पोटी करून घ्याव्यात .

4)डोळ्यांच्या तपासणी साठी दिनांक - 09 जानेवारी 2021 ते 10 जानेवारी 2021 

ममता हॉस्पिटल येथे सकाळी 11 am सायंकाळी 12 pm या वेळ तपासणी करून घ्यावी या शिबिराचा सर्व पत्रकार बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नरसिंह घोणे, सचिव सचिन मिटकरी यांनी केले आहे.  


Post a Comment

0 Comments