शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना
लातूर:{प्रतिनिधी}भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर व समता सैनिक दल लातूर बटालियन च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारी 1818 रोजी शहीद झालेल्या शूरवीरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षक आशाताई चिकटे, लातूर जिल्हा जिओ सी तथा सरचिटणीस अर्जुन कांबळे समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाराम साबळे, डिव्हिजन ऑफिसर विकास दंतराव, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, समता सैनिक दल जिल्हा सचिव अभिमन्यू लामतुरे, जिल्हा सचिव बौद्धाचार्य नानासाहेब आवाड, जिल्हा सचिव बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले, महिला विभाग जिल्हा सचिव मंगलताई सुरवसे, जिल्हा कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य हनमंत कांबळे, लातूर शहराध्यक्ष कुंदन गायकवाड, शहर उपाध्यक्ष विलास गायकवाड, शहर उपाध्यक्ष बिभीषण माने, शहर सचिव अजय गायकवाड, तालुका सरचिटणीस प्रा. जीवन गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष राजाभाऊ उबाळे, तालुका उपाध्यक्ष देवराव जोगदंडे, तालुका सचिव प्रेमनाथ कांबळे, तालुका संघटक संजय गायकवाड, अशोक शिंदे सर तसेच लातूर शहरातील सैनिक व उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments