Latest News

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने सक्षम महिला मंडळाची स्थापना

सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने सक्षम महिला मंडळाची स्थापना

अध्यक्षस्थानी अफसना शेख तर गाव प्रमुखपदी आशा स्वामी

चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) सक्षम महिला मंडळाच्या वतीने चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात रविवार (दि.३) रोजी मोठया उत्साहात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एकल महिला संघटनेच्या वतीने महिलांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. बालिका दिन, महिला मुक्तिदिन व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून हाळी खुर्द येथे सक्षम महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. एकल महिला संघटनेच्या तालुका सचिव आम्रपाली तिगोटे, सुरेखा मसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील महिलांची बैठक घेण्यात आली. यात अध्यक्ष - अफसना शेख, उपाध्यक्ष - समीना शेख, सचिव - छाया शिंदे तर गाव प्रमुख म्हणून आशा स्वामी यांची निवड करण्यात आली. एकल महिला संघटनेच्या वतीने तालुक्यातील पंचवीस गावांमध्ये दोन हजार महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यात येत आहे. यावेळी आंम्रपाली तिगोटे यांनी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्गदर्शन केले तर मेहराजबी शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन समुदाय संसाधन व्यक्ती अफसना शेख यांनी केले. या कार्यक्रमास माजी ग्राम पंचायत सदस्या रुकिया पटेल, माया गायकवाड, ललिता भोसले, कोशल्या भोसले, कालिंदा हैद्राबादे, आशा कार्यकर्ती मुक्ता शिंदे, मेहरुणीसा शेख, अंगणवाडी,  कार्यकर्ती शितल शिंदे यांच्यासह गावातील पंचवीस बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments