Latest News

6/recent/ticker-posts

औसा न प कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व अनुषंगीक लाभाची रक्कम थकल्याने पालिका कर्मचाऱ्यांची उपासमार

औसा न प कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व अनुषंगीक लाभाची रक्कम थकल्याने पालिका कर्मचाऱ्यांची उपासमार

औसा:(तालुका प्रतिनिधी बी.डी. उबाले) दि.२९ - औसा नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन, अनुषंगिक लाभाची रक्कम तसेच रजा रोखीकरणाची रक्कम थकीत असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रजा रोखीकरण 4 लाख 59 हजार 980, निवृत्ती वेतनापोटी 6 लाख 33 हजार आणि पेन्शन विक्रीचे 8 लाख 47 हजार 315 अशी एकूण 19 लाख 40 हजार 750 रुपये थकले असून मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना वेळोवेळी विनंती करूनही रक्कम मिळत नसल्याने माझ्या मुलीचे लग्न आणि बांधकाम मी करू शकत नाही. पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची तक्रार सेवानिवृत्त कर्मचारी आत्माराम हरिबा बनसोडे यांनी केली आहे. तसेच नगर पालिकेतील कायमस्वरुपी व  कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचीही उपासमार होत असल्याने नगर पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत नगराध्यक्ष अफसर शेख यांना संपर्क साधला असता त्याचा समपर्क नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणेच भ्रमण ध्वनी बंद दाखविला आणि त्याचा संपर्क होऊ शकला नाही. 

शासनाकडून नियमित वेतनसाठी येणारी रक्कम कमी असून नगरपरिषदेची थकबाकी आणि वसुली मोठ्या प्रमाणात प्रमाणात राहिल्याने नगरपालिकेकडे कोणताच आर्थिक फंड नाही यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वेतन व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम थकलेली आहे याकरिता नगरपरिषद ने व्यापक वसुली मोहीम राबवून वसुली करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांची हक्काची रक्कम वाटप करण्याची तरतूद युद्धपातळीवर सुरू आहे.

- तानाजी चव्हाण,मुख्याधिकारी, नगर परिषद औसा

Post a Comment

0 Comments