Latest News

6/recent/ticker-posts

एन बी मराठी न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना यौद्धाचा पुरस्कार देऊन केला सन्मान

एन बी मराठी न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना यौद्धाचा पुरस्कार देऊन केला सन्मान

 


लातूर
:(प्रतिनिधी) एनबी मराठी न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व स्वर्गवासी रवींद्र जगताप यांच्या स्मरणार्थ स्व. रवींद्र जगताप कोरोना योद्धा पुरस्कारचे पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व प्रामुख्याने ज्यांनी कोरोना काळामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवल्या अशा कोरोना युद्धांचा यावेळी वेळेस सन्मान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल तुळशीचे रोपटे व महिला कोरोना योद्धाना साडीचोळी अशा स्वरूपाने यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभिजीत देशमुख  तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नरसिंह घोणे, सिद्धार्थ मोरे, सरफराज मनियार, मोहसीन खान, मारुती कर्‍हाळे आधीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन बी मराठी न्यूजच्या संपादक नितिन भाले यानी केले.तर सूत्रसंचालन अहिल्या कस्पटे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र जोंधळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments