Latest News

6/recent/ticker-posts

धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न

धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न  

निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) धानोरा गावातील जनतेनी व सत्याई ग्रुप च्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेहून 2021 या नवीन वर्षाचे औचित्य साधून " चला नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानाने करू या " या संकल्पनेने आज शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला गावातील जनतेनी मोठा प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले.या रक्तदानाची सुरुवात धानोरा ग्रा.प. चे ग्रामसेवक श्री.लामतुरे यांनी प्रथम रक्तदान करून सुरुवात केली. 32 पिशवी रक्तदान झाले अशी माहिती आयोजकांनी दिली.या वेळी गावातील नागरिक व सत्याई ग्रुप चे सदस्य व भालचंद्र ब्लड बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments