निलंगा येथे कपडा बँकेची (माणुसकीची भिंत) उभारणी
निलंगा: (तालुका प्रतिनिधी/इरफान शेख)नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जाकीर सामाजिक विकास संस्था अंतर्गत जनहित स्वच्छता अभियान टीमच्या वतीने माणुसकीची भिंत (कपडा बँक ) दत्त नगर कॉर्नर येते उभारण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 50 साड्या , 50 ड्रेस, व 50 लहान लेकरांचे ड्रेस, गरजूंना देण्यात आले. जाकीर सामाजिक विकास संस्थेने निलंगा वासियांना आव्हान केले की आपल्या घरी जुने कपडे ,सुटर, लहान लेकरांचे कपडे, चप्पल, बूट, सॉक्स, साडी, इत्यादी सर्व साहित्य देऊन सहकार्य करावं जेणेकरून गरजूंना एक प्रकारची मदत होईल. असे आव्हान जाकीर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी टीमचे सदस्य जाकीर शेख,राहुल पोतदार,अबू सय्यद,ऋषिकेश पोतदार,लखन लोंढे,आजम सय्यद,रोमान तांबोली,सैफ शेख ,विजय माने ,कृष्णा पळसे ,शाहंजेब कादरी ,राम लोंढे किरण सोळंके ,इरफान शेख आदी जण उपस्थित होते.
0 Comments