दिव्यांगासाठी राखीव ५% निधी १५ जानेवारी पर्यत जमा होणार
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} अपंग हक्क स्वाभिमान प्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेच्या वतीने चाकुर नगरपंचायत कार्यालयामध्ये दि.६/७/२० रोजी मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे यांना सन २०२०-२१ या वर्षीचा दिव्यांगाचा राखीव निधी वाटप करण्यासाठी संघटनेच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते.संघटनेच्या वतीने अनेक वेळा मागणीचा तगादा लावुन धरण्यात आला.वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.संघटनेच्या पदधिकार्याना तोंडी आश्वासन देण्यात येऊ लागले.अपंग स्वाभिमानी प्रतिष्ठाण सेवाभावी संस्था दिव्यांग व्यक्तीच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे.दिव्यांग व्यक्तीना शासन निर्णयानुसार ज्या योजनांचे लाभ होत नाही त्या योजनेचा पाठपुरावा करुन मंजुर करुन देण्यासाठी प्रयत्नशील असते. चाकुर नगरपंचायत मधील दिव्यांगाचा राखीव निधी फक्त एकाच वर्षाचा वाटप करण्यात आला आहे.२०१९-२०२० चा निधी दिव्यांग व्यक्तीना मिळाला नाही.चाकुर नगरपंचायत मधील सर्व दिव्यांग बांधवाना ५% निधी आर्थिक स्वरुपात तात्काळ देवुन लोकडाउन मध्ये दीव्यांगाणा जीवन जगण्यास सहकार्य करावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले होते.त्याअनुशंगाने ३१ डिसेंबर रोजी संघटनेच्या वतीने नगरपंचायत मध्ये दीव्यांगाच्या ५% राखीव निधीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या वतीने आंदोलनास यश आले असुन मुख्याधिकारी यांनी दीव्यांगासाठीचा जो ५% राखीव निधी आहे.तो निधी लाभाथ्याच्या खात्यावर १५जानेवारी पर्यंत देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठाण महाराष्ट्रच्या पदधिकारी यांनी ठाय्या आंदोलन मागे घेतले. यामध्ये बिलाल हरणमारे संस्थापक कोषाध्यक्ष अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठाण महाराष्ट्र,बाबा शेख,निसार हरणमारे,मलेखा शेख,महेबुब शेख,शादुल शेख,राजु कसबे,अमोल,शरुल बागवान,आदि दिव्यांग उपस्थित होते.
0 Comments