निलंग्यात राष्ट्रनिर्माण फाऊंडेशनचे स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) नवीन वर्षाच्या निमित्ताने आज शुक्रवारी बँक कॉलनी निलंगा येथे राष्ट्रनिर्माण फाउंडेशन बुजरूगवाडी या सामाजिक संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. निलंगा तालुक्यातील 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना या केंद्राच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. केंद्राचे उद्घाटन प्रमोद कदम ( संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष निलंगा ) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सच्चीतानंद पाटिल, विशाल गवारे, सत्यवान कांबळे, राठोडकर व सुमारे दोनशे विध्यार्थी, पालक उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष राम भोयबार यांनी विद्यार्थ्यांना केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
0 Comments