औसा तालुक्यात 46 ग्रामपंचायतीसाठी तब्बल 1244 अर्ज
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी.डी.उबाळे)दि.३१ - औसा तालुक्यातील 46 ग्राम पंचायतीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा नंतर तब्बल 1244 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यात 626 महिला आणि 618 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे .गाव निहाय नामनिर्देशन पत्रांची संख्या पुढील प्रमाणे उंबडगा खु. 20, सेलू 22, हसाळा 16, हसेगाव 42, हसेगांववाडी 28, शिवनी बु. 19, धानोरा 17, भुसणी 38, चलबुर्गा 15, वाघोली 27, जयनगर 19, चिंचोली का. 23, कमालपुर 5, उजनी 79, कुमठा 22, अपचुंदा 21, खरोसा 31, भादा 43, भेटा 36, समदर्गा 21, लामजना 91, मोगरगा 40, टाका 30, मासूर्डी 33, बेलकुंड 27, पारधेवाडी 12, कार्ला 44, हरेगाव 26, लोदगा 34, शिंदाळा ज. 8, जमालपूर 16, शिंदाळा लो. 22, शिंदाळावाडी 9, कोरंगळा 19, बऱ्हाणपूर 15, लखनगाव 22, सत्तारधरवाडी 35, तळणी 25, नांदुर्गा 31, मंगरूळ 24, माळुंब्रा 15, तुंगी बु. 32, मसलगा खु. 11, नागरसोगा 25, तपसेचिंचोली 31, अशा एकूण 1244 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा करीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दि. 30- 12- 2020 रोजी सायंकाळी 5 : 30 वा. पर्यंत वेळही वाढन दिला होता.
रात्री उशिरा पर्यंत भरलेले नामनिर्देशन पत्र
30 डिसेंबर 2020 रोजी औसा तहसील कार्यालयात 5 : 30 वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कक्षात प्रवेश केल्यानंतर रात्री 10 : 30 पर्यंत नामनिर्देशन पत्र इच्छुकांनी सादर केले. औसा तहसील कार्यालयातील कर्मचारीवर्गाने कोणीही इच्छुक उमेदवारी दाखल करण्यापासून वंचित राहू नये म्हणून उशिरापर्यंत कामकाज केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये 1244 पैकी महिला उमेदवारांचा अधिक समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी व नायब तहसीलदार शिवाजी कदम यांनी दिली.
0 Comments