Latest News

6/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी Online प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी Online प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

लातूर:(जिमाका) दि. 22 -  कृषि विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात असून त्याअंतर्गत कृषि आधारित व्यवसायीक प्रस्तावांना सहाय्य करण्यासाठी  जिल्हयातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी तसेच सदर प्रकल्पातांर्गत कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी करण्यात आलेले शेतकरी उत्पादक गट/महिला बचतगट/स्वयंसहाय्यता गट व सहकारी संस्था यांनी कृषि आधारित व्यावसाय Online प्रस्ताव https://cfp.smart-org या वेबसाईटवर सादर करावेत. यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन धान्य व फळेविषयक प्रकल्प अहवाल, मुल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन संदर्भातील प्रकल्प अहवाल, कृषि मुल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण विषयक प्रकल्प अहवाल, कृषि व्यवसायाला प्रोत्साहन मिळणेसाठीचे उपक्रम, स्वच्छता व प्रतवारी युनिट,बियाणे प्रक्रिया केंद्र व गोदाम याबाबत प्रोत्साहन देणारे प्रकल्प अहवाल. या कृषि उद्योजकता प्रस्तावामधील उभारणीसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे व बांधकाम आणि शेतमाल  वाहतूक व्यवस्था या बाबींनाच अर्थसहाय्य उपलब्ध्‍ होईल. बांधकाम, मशिनरी व उपकरणे या बाबींवरील खर्चाच्या 60 टक्के अनुदान  देण्यात येईल. तरी संबंधितांनी याबाबतचे सविस्तर प्रकल्प अहवाल Online https://cfp.smart-org या वेबसाईड सादर करावे. या संदर्भात संबंधित तालूका कृषि अधिकारी कार्यालयातील BTM/ATM यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव Online सादर करावे. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा डी.एस.गावसाने यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

0 Comments