Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा उस्तुरी मार्गे कासार शिर्सी व औराद शटल एस.टी बस चालु करा:नागरिकांसह विद्यार्थ्यांची मागणी

निलंगा उस्तुरी मार्गे कासार शिर्सी व औराद  शटल एस.टी बस चालु करा:नागरिकांसह विद्यार्थ्यांची मागणी

कासार बालकुंदा:{प्रतिनिधी मारुती लोहार}कोरोना लाकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद केलेली निलंगा ते उस्तुरी मार्गे कासार शिर्सी शटल एस.टी बस पुन्हा चालु करावी अशी नागरिकासह विद्यार्थ्यांची मागणी आहे. निलंगा ते उस्तुरी मार्गे शटल बस चिंचोली(भं.),चिंचोली(स.),वाक्सा,उस्तुरी,बडुर,औंढा कासार शिर्सी सकाळी दोन व दुपारी दोन फेर्या करत होती.पण टाळेबंदीच्या काळात सहा महिन्यांपासून बस बंद असल्याने या भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना तासनतास प्रवासासाठी वाहनांची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे‌.काही दिवसांपासून नववी व बारावी शाळा चालू झाल्याने विद्यार्थांना शाळा,कालेज जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.टमटम भरल्याशिवाय निघत नाहीत.कासार शिर्सी येथे मोठी बाजारपेठ असल्याने वाक्सा,उस्तुरी,बडुर व औंढा या गावातील नागरिकांना ही बस सोयीची होती.तसेच औराद सिरसी ही बस टाकळी,वाक्सा,कलमुगळी,माळेगाव मार्गे जाते. तेही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. हे बस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.या गावातील नागरिकांना तासनतास प्रवासासाठी वाहनांची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे.टमटम भरल्याशिवाय निघत नाहीत.त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.उस्तुरी येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असुन परीसरातील गावे या बँकेस जोडण्यात आले आहे.परिसरातील गावे जोडल्याने परिसरातील महिला बचत,शेतकरी बांधव,व्यापारी, विद्यार्थ्यांना ईत्यादी लोक बँकेस येतात.निलंगा ते उस्तुरी मार्गे कासार शिर्सी शटल बस बंद असल्याने परिसरातील ग्राहकांची गैरसोय होत आहे.परिसरातील महिला बचत गटातील महिलाना  बस नसल्याने चालत उस्तुरी येथील बँकेस येत आहेत.त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.निलंगा उस्तुरी मार्गे शटल कासार शिर्शी बस चालु करावे अशी मागणी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments