Latest News

6/recent/ticker-posts

अहो ऐकलय का? किंमत ऐकुनच उडतेय झोप, एकशे दहा रु. किलो कांद्याचे। रोप !!

अहो ऐकलय का? 

किंमत ऐकुनच उडतेय झोप, एकशे दहा रु. किलो कांद्याचे। रोप !! 

(बाबुराव आगलावे)

 भादा: एरव्ही सना - सुदीला भलताच भाव खाणारा व शेतक-यांच्या रोजच्या आहारात घरकी मुर्गी दाल बराबर असणा-या कांद्याचं रोप सध्या मात्र  भलतच तेजीत असुन आज भादा . जि. लातुर येथे एका किलोला एकशे दहा रुपये  भावाने रोपाची विक्री झाली. तस्सं तर  या वर्षी झालेल्या वादळी पावसाने सुरूवाती पासुनच शेतक-यांनी रोपे तयार करण्यासाठी टाकलेले बियाणे  जास्त पावसामुळे व्यवस्थीत आले नाहीत, शिवाय कांद्याच्या बियानाच्या किंमती  दिवसेंदिवस खुपच वाढत चालण्याने ते परवड नसल्याचे मत अनेक रोपे तयार करणारे शेतकरी ग-हाणं करताना दिसत आहेत.  याच बरोबर एकतर कांद्याचे बियाणे टाकुनही रोपे व्यवस्थीत आली नसल्याने  बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचा दिसतोय तर दुसरीकडे एवढ्या महागाची रोपे घेवुन कांदा  लागवड करणं परवडत नसल्याचा सुर अनेक शेतकरी काढताना दिसत आहेत. एकशे दहा रुपये किलो ने कांदा रोपे विकत घेवुन लावणे सध्या तरी  आम्हाला परवडत नसुन   आज एवढ्या महागाचे  रोपे लावुन भविष्यात कांद्याला काय भाव राहील हे सांगता येत नाही.  सध्या शेतक-यांच्या हातात फक्त घाम गाळायचं आहे. उत्पादीत झालेल्या मालाचा भाव ठरवणं आजही त्याच्या हातात नाही. त्यामुळे हि व्यवस्था बदलायला पाहीजे .  अन्यथा एवढ्या महागाची  कांदा लावण अवघड आहे. 

प्रगतशील शेतकरी- जन्मेंजय गायकवाड भादा.

Post a Comment

0 Comments