भादा-औसा रस्ता दुरुस्ती म्हणजे "काम सुरु थातूर-मातूर,गडबडीने लावले मोहतुर"
औसा:(तालुका प्रतिनिधी) दि.१५ - औसा-भादा -औसा रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असून गेल्या अनेक महिन्यापासून हा रस्ता खूपच खराब झाला होता. त्यामुळे वाहनांचे माणसाच्या शरीराची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हा भादा-औसा रस्ता दुरुस्ती प्रताप पाहून अचानकपणे तोंडून वाक्य गेले की हा रस्ता दुरुस्ती चे काम म्हणजे "थातुरमातूर गडबडीने लावले मोहतुर" असे उदगार एका प्रवाशाने काढले.या रस्त्यावर दिवसाकाठी हजारो वाहनांची रेलचेल होते परंतु या रस्त्याकडे कोणत्याही पुढारी,अधिकारी, आमदार,खासदार यांचे किंचितही लक्ष नाही.यामुळे औसा- -मुरुड, भादा पर्यंतचा रस्ता रस्ता "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता" अशी अवस्था हा प्रवास करताना प्रत्येक नागरिकास अनुभवास येतो. औसा-भादा हा १३ किलोमीटर चा रस्ता प्रवास करून जाण्यासाठी किमान अर्धा तास तास लागतो आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होत आहेत. रात्री हा प्रवास करणे खूप जिकरीचे आणि कठीण असल्याचे प्रवासी नागरिक सांगतात.तरीही याकडे कोणाचेही लक्ष नाही अशी अवस्था या रस्त्याबाबत झालेली दिसून येते.यामुळे नागरिकांना गावी ये जा करणे कठीण झाले आहे. रस्ता असा दुरुस्त करण्याऐवजी हॉटमिक्स डांबरीकरण करावे अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
0 Comments