Latest News

6/recent/ticker-posts

भाटसांगवीत विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला कवठे शेतकरी कुटुंबियांचे अडीच लाखाचे नुकसान

भाटसांगवीत विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला कवठे शेतकरी कुटुंबियांचे अडीच लाखाचे नुकसान 

चाकूर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} तालुक्यातील भाटसांगवी येथील राधा गणपत कवठे यांच्या शेतातील ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाला असल्याने जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून तशी तक्रार राधा कवठे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे केली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की भाटसांगवी येथील राधा गणपत कवठे यांची गट नंबर ६४ मध्ये एक हेक्टर ५३ आर एवढी जमीन आहे . त्यापैकी ८० आर क्षेत्रातील ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून मोठे नुकसान झाले आहे .बुधवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या डी .पी .मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने स्पार्किंग होवून शेतातील ऊस जळाला आहे . त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे हे नुकसान झाले असल्याने सदरील ट्रान्सफार्मर काढण्यात यावे .व जळलेल्या ऊसाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments