Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामीण रुग्णालयासाठी मंत्रीगणाला वलांडीकरांचे साकडे;मंत्र्याची भेट घेवुन मांडली आरोग्य सुविधेची कैफियत

ग्रामीण रुग्णालयासाठी मंत्रीगणाला वलांडीकरांचे साकडे;मंत्र्याची भेट घेवुन मांडली आरोग्य सुविधेची कैफियत

देवणी:{ तालुका प्रतिनिधी/विक्रम गायकवाड} तालुक्यातील सिमाभागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देवुन या भागातील आरोग्य सुविधा सुलभ व्हाव्यात यासाठी वलांडी ग्रामपंचायतच्या वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडुन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या पाठपुरावा करणार असल्याचे सुतोवाच शिष्टमंडळास दिले. वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आठ उपकेंद्रेसह ३३ गावाची आरोग्य सुविधा पुरवली जाते.शिवाय सिमाभागातील कर्नाटक राज्यातील नागरिकांचा लोंढाही या रुग्णालयाकडे येतो.उद्दिष्टापेक्षा जास्त होणाऱ्या  कुटुंबशस्त्रक्रिया होत असतात.कोरोनासारख्या महाभयंकर अजारावर प्रतिबंध करताना येथे  झालेली गर्दी ,अपुरे वैद्यकीय अधिकारी  , कर्मचारी,औषधाचा अभाव यामुळे रुग्णाची नेहमीच हेळसांड होत आहे.यासर्व बाबी परवा वलांडी येथील शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट देवुन  प्राथमिक आरोग्य केंद्रास ३० खाटाचे ग्रामीण रूग्णालय मंजुरी द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे ,लातुरचे पालक मंत्री अमित देशमुख, संजय बंनसोडे , बाळासाहेब थोरात  यांना भेटुन आरोग्याची कैफियत मांडली. व उभयंताना निवेदन देण्यात आले.यावेळी वलांडीचे राष्ट्रवादी महाराष्ट्र सहसचिव  मोहम्मद रफी सय्यद,माजी सभापती गोविंदराव  भोपणीकर,मधुकर लाडंगे यांनी वलांडीचे प्रतिनिधित्व करत निवेदन सादर केले. जि.प.चा ठराव मंत्रालयाकडे. वलांडी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी जि.प कडे पाठवण्यात आला.याची दखल घेत जि.प.च्या सर्वसाधारण बैठकीत ठराव पारीत करुन ३ सप्टेबंर १९ रोजी आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. बनसोडे नी स्वीकारली जबाबदारी. संजय बनसोडे हे हेर विधानसभा मतदार संघातुन आमदारकीसाठी इच्छुक होते.या भागाचे लोकप्रतिनिधी होता आले नसले तरी आता जिल्ह्याचे मंत्री अन वलांडीसाठी असलेले प्रेम म्हणुन ग्रामीण रुग्णालय मंजुरी करण्याची जबाबदारी संजय बनसोडे यांनी स्वीकारली अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.

Post a Comment

0 Comments